कार चालक गंभीर जखमी
| पाली | प्रतिनिधी |
पाली- खोपोली राज्य महामार्गावर बुधवारी (दि.23) तिवरे गावच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एका कार मधील चालक गंभीररीत्या जखमी झाला असून, दोन्ही ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाली- खोपोली राज्य महामार्गावरून जात असताना तिवरे गावच्या हद्दीतील वळणावर होंडा कंपनीची कार व मारुती कंपनीची सिलेरिओ कार या दोन कारचा एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सिलेरिओ कार चा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून, कार मधील इतरांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्हीही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कारमध्ये फुटलेल्या दारूच्या बाटल्या आढळल्या. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.







