नाना पटोलेंचा गाडीला भीषण अपघात

ट्रकच्या धडकेत गाडीचे मोठे नुकसान

| भंडारा | वृत्तसंस्था |

भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली. मंगळवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट झालेलं नाही. मात्र चालकाचं ट्रकवरील नित्रंयण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव ट्रक ताफ्यात घुसून हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version