व्हिनस वायर कंपनीला भीषण आग

| खोपोली । वार्ताहर ।
व्हिनस वायर कंपनी आत्कर गावासमोरील कंपनीत आग लागली आहे. आगीने रूद्रावतार घेतल्याने फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. खोपोली येथील आत्कर गावासमोरील व्हिनस वायर कंपनीत अचानक आग लागली. या आगीने रूद्रावतार घेतल्याने परिसरात धुराचे लोट उठले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर ब्रिगेडच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवान्या झाल्या आहेत.

सदर कंपनी बंद असून त्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल आहे, याचा अंदाज येऊ शकला नाही. सध्याला केमिकलच्या ड्रमला आग लागलेली आग विझविण्याचे काम सुरू आहे. तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे एपीआय हरीश काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम घटनास्थळी हजर झाली आहे. दरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

Exit mobile version