श्रीनगरमध्ये पोलीस व्हॅनवर अतिरेकी हल्ला; 2 जवान शहीद

श्रीनगर | वृत्तसंस्था |
श्रीनगरमध्ये एका पोलीस बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार या घटनेत दोन जवान शहीद झाले असून, अन्य 12 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे सोमवारी सायंकाळी झाला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
तसेच, प्राप्त माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणार्‍या जाणार्‍या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

Exit mobile version