तोयबाकडून 46 रेल्वे स्टेशन्स टार्गेट
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिवाळी आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट घोषित करण्यात आलाय.
दहशतवादी संघटना मलष्कर ए तोयबाफकडून अयोध्य, लखनऊ, वाराणसी यांसहीत राज्यातील 46 रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. शनिवारी रात्री उशिरा मिळालेल्या गुप्तचर संघटनांच्या सतर्कतेच्या इशार्यानंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर उत्तर प्रदेशच्या सर्वच रेल्वे स्टेशन्सवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.
, हापुड रेल्वे स्टेशन अधीक्षकांना टपालाद्वारे एक पत्रं मिळालंय. यामध्ये, मलष्कर ए तोयबाफकडून 26 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हापूर, गोरखपूर, लखनऊ, खुर्जा, अलीगढ, कानपूर, तुंडला, बरेली आणि मुरादाबाद ही रेल्वे स्थानकं बॉम्बस्फोटात उडवली जातील अशी धमकी देण्यात आलीय. तसंच 6 डिसेंबर रोजी प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, उज्जैन, मुंबई आणि अहमदाबादची मंदिरं बॉम्बनं उडवण्यात येतील, असा उल्लेखही या पत्रात आहे.