| मुंबई | प्रतिनिधी ।
राष्ट्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी गेल्या एका महिन्यात खडखड आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले. 26 नोव्हेंबर 2008 छाबाद हाऊसवर हल्ला झालेल्या घटनेला 15 वर्ष उलटली आहे. मुंबईतल्या ज्यूंसाठी हक्काच्या ठिकाणाची अतिरेक्यांनी चाळण केली. तेच छाबाद हाऊस पुन्हा एकदा अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहे.