| आगरदांडा | प्रतिनिधी |
वेदांत कंपनीचा 1.45 लाख कोटींचा महाराष्ट्रातील एक लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याबद्दल शिंदे व फडणवीस सरकारांचा निषेध करण्यासाठी मुरुड शहरातील बाजारपेठेत ठाकरे युवासेना रस्त्यावर उतरुन खोके सरकारांचा निषेध करण्यात आला.
यावेळी ठाकरे शिवसेनाच्या वतीने जोरदार घोषणाबाजीत सरकारांच्या विरोधात स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके, 50 खोके एकदम ओके, शिंदे सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय या घोषणांनी शहर दुमदुमून गेला. त्यानंतर यासंदर्भात मुरुड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेदांत कंपनीचा 1.45 लाख कोटींचा महाराष्ट्रातील 1 लाख तरुणांना रोजगार प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तरी वेदांत कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबाबत सह्यांच्या माध्यमातून होणारा निषेध नोंदविण्यात आला आहे. याबाबत वेदांत कंपनीचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणणे करिता शासनाकडे कळविण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नौशाद दळवी, युवा शहर अधिकारी प्रतिक उमरोटकर, माजी पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत मोहिते, योगेश सुर्वे, माजी नगरसेविका मुग्धा जोशी, नरेश कुबल, विधानसभा युवा अधिकारी रूपेश रोटकर, तालुका युवा अधिकारी विक्रांत कुबल, महिला तालुका अध्यक्ष राजेश्री मिसाळ, सुनील शेळके, स्मिता धोत्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.