| नाशिक | प्रतिनिधी |
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समावेश असलेल्या नाशिक मतदारसंघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये गुरुवारी रोड शो केला. हा रोड शो सुरु असताना हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या रोड शो वेळी प्रचाररथ रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी एका चौकात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले. तेव्हा घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरु झाल्यानंतर एका चौकात ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोळका करुन उभे होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रचाररथ येताना दुरुनच पाहिले. त्यानंतर ठाकरे गटाच्या सैनिकांनी ’50 खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दूर अंतरावर रोखून ठेवले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांचा प्रचार रथ चौकात येताच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली.