समाजसेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदीवासी, ठाकूर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आदिवासी ठाकूर समाजसेवा संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या पुढाकाराने अलिबागमध्ये कुरुळ येथील सभागृहात आदिवासी, ठाकूर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी अलिबागचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष मालू निरगुडे, गणेश निरगुडे, पांडू सुतक, धनाजी शिद, गणपत शिद, काशीनाथ दरवडा, धर्मा गडखळ, यशवंत शिंगवा, बाळाराम शिद, मोहन मेंगाळ, बाळाराम मेंगाळ, पप्पू सोनार, कृष्णा सुतक, यशवंत मेंगाळ, किसन काष्टे, पदमा हंबीर, अर्चना हंबीर, कुशा काष्टे, कल्पेश शिद आदी पदाधिकारी, मान्यवर, सदस्य, विद्यार्थी व समाज बांधव, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदीवासी ठाकूर, समाजाच्या उन्नतीसाठी संस्था काम करीत आहे. सामाजिक, क्रिडा अशा वेगवेगळ्या क्षेत्राबरोबरच समाजातील मुला, मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील संस्थेने काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये आदीवासी, ठाकूर समाजातील मुले, मुली चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी, ठाकूर, समाज सेवा संस्थेच्यावतीने कुरुळ येथे गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. दहावी व बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाना उतीर्ण झालेल्या 12 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. उतीर्ण झालेल्या 47 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मालू निरगूडे यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढत असताना समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा कौतूक केले.
शिक्षण महत्वाचे आहे. आदीवासी ठाकूर समाजातील मुले, मुली चांगले शिक्षण घेत आहेत. पालक वर्गाकडून त्यांना चांगला पाठींबा दिला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात समाजातील मुला मुलींची प्रगती बघून खर्या अर्थाने समाधान होत आहे.
कृष्णा पिंगळा
गट शिक्षणाधिकारी,
अलिबाग







