थळ ग्रुपग्रामपंचायतीचे तात्काळ विभाजन करणार; आ. जयंत पाटील यांच्या प्रश्‍नावर हसन मुश्रीफ यांचे उत्तर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील थळ गु्रपग्रामपंचायतीचे रखडलेले विभाजन करण्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नोत्तराच्या तासात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर विभाजनाचा प्रस्ताव तात्काळ मंजुर करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात दिली.

विधानपरिषदेत आमदार जयंत पाटील म्हणाले की, 500 लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत असा नियम 1991 मध्ये मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कालावधीत करण्यात आला. मात्र आज 10 हजार लोकसंख्येची ग्रामपंचायत असलेली पहायला मिळते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ ही 11 गावांची ग्रामपंचायत आहे. यात 4 ते 5 महसूल गावे आहेत. या ग्रामपंचायतीचे बजेट 12 ते 15 कोटींपर्यंत आहे. तरी त्या ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही. राज्य शासनाकडे या संबंधीचा प्रस्ताव पडून आहे. त्यावर राज्य शासन कारवाई करेल का, असा प्रश्‍न शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केला. यावर ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असे मी विचारलेल्या प्रश्‍नांला उत्तर दिले.

Exit mobile version