पार्किंग समस्या सुटल्याने पोलीसांचे आभार

। उरण । वार्ताहर ।
सोनारीगावा लगतच्या आजूबाजूच्या परिसरात करळपूल, स्पीडी यार्ड, पेट्रोलपंप या मार्गावर नेहमी उभे केलेले अवैध कंटेनर पार्किंग सोनारी ग्रामस्थांना घातक ठरत होती. तसेच या अवैध कंटेनर पार्किंगमुळे अनेकांचे जीव गेले असून काहींचे अपघात सुद्धा झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिल्या. मात्र एवढे घडून सुद्धा या कडे वाहतूक विभागाचे नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात होते. याबाबत वारंवार सोनारी ग्रामस्थ व काही सामाजिक संस्थानी याबाबत कायदेशीर पत्रव्यवहार करून देखील ही समस्या सुटली नाही. त्यामुळे शुक्रवार दिनांक 20 मे रोजी सोनारी ग्रामस्थ व महिला आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी या पुढे अवैध कंटेनर पार्किंगची समस्या सुटली नाहीतर पार्किंग केलेल्या गाड्या आम्ही फोडू असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला होता.याची दखल घेत वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाने घेऊन या ठिकाणी डिव्हायडर लावून सर्व्हिस रोड वरील उभी राहणारी अवैद्ध पार्किंग हटविली. याबद्दल सोनारी ग्रामस्थानी वाहतूक विभागाचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांची व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक.निरज चौधरीयांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी अनघा कडू ,अल्पा कडू,अंकिता कडू, अल्पेश कडू, हितेश कडू आदी उपस्थित होते.

Exit mobile version