रक्तदान करण्याचे कार्य कौतुकास्पद; डॉक्टर्स डेनिमित्ताने शिहू येथे 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

। सुकेळी । वार्ताहर ।
जुलै जागतिक डॉक्टर्स डेनिमित्ताने रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे शुक्रवार, दि. 1 जुलै रोजी शिहू येथील डॉ. पुरूषोत्तम भोईर यांच्या निवासस्थानी 50 रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे कौतुकास्पद काम केले.
यावेळी रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनील पाटील, डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. प्रिया भोईर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, कामगार नेते लक्ष्मण खाडे, अजिंक्य पाटील, माजी सभापती संजय भोईर, पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके, मा. सरपंच नरेश पाटील, विशाल दिवेकर, के.के. कुथे, विजय पाटील, दामोदर भोईर यांच्यासह अलिबाग रक्तपेढीच्या डॉ. सारिका बिडये, डॉ. दि क्षा तोडणकर, सुनील बंदिछोडे, पूनम पाटील, आकाश सावंत, उमेश पाटील, अमोल साळवी आदी उपस्थित होते.

Exit mobile version