भाजी मंडईने घेतला मोकळा श्वास

कृषीलवच्या दणक्याने प्रशासनास जाग

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीने तीन-चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन भाजी मंडईची उभारणी केली होती. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही इमारत गवत आणि काटेरी झाडेझुडुपांच्या विळख्यात सापडली होती. याला कृषीवलने वाचा फोडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले. त्यानंतर संपूर्ण इमारतीची साफसफाई केल्याने भाजी मंडईने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी कृषीवले आभार मानले.

सदैव गजबलेली खांब बाजारपठेत पंचवीस ते तीस गावांचा समावेश येतो. त्यासाठी बाजारपेठेत एकाच ठिकाणी ग्राहकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी तेथील ग्रामपंचायत हद्दीत तसेच खांब नाक्यावर विविध योजनेंतर्गत भाजी मंडई इमारत उभारण्यात आली होती. तद्नंतर कोरोनाची लाट सुरू झाली. इमारत झाली, मात्र त्यात भाजी मार्केट सुरूच झाले नसल्याने तसेच ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे लाखो रुपये शासनाचे खर्च करून बांधण्यात आलेली भाजी मार्केट इमारत गवताच्या व झाडांच्या विळख्यात सापडून तिची दुरवस्था झाली होती. तसेच त्यामागे असलेले खांब सजाचे तलाठी कार्यालय हेदेखील दिसेनासे झाले असल्याची बातमी कृषीवल वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन या इमारतीत तसेच बाजूला भयानक वाढलेली ही काटेरी झुडपे आणि गवत काढण्यात आले. त्यामुळे खांब परिसरातील अनेक नागरिकांनी कृषीवलचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

Exit mobile version