| रसायनी | वार्ताहर |
विद्यमान खासदार दाखवा आणि हवे ते जिंका अशी परिस्थिती असलेल्या मायक्रो लोकालिटीमध्ये संजोग वाघेरे पाटील थेट भिडत झंझावाती प्रचार करत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. शुक्रवार, दि. 3 मे रोजी संजोग वाघेरे पाटील यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांकडून दुर्लक्षित झालेल्या क्षेत्रामध्ये प्रचार दौरा झाला. इंडिया आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ संजोग वाघेरे पाटील यांना लाभत असल्यामुळे पनवेल परिसरात पुन्हा एकदा संजोग वाघेरे पाटील यांचा दणदणीत आवाज घुमला.
संजोग वाघेरे पाटील यांच्यासमोरील मशाल निशाणी असलेले बटण दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा, अशा स्वरूपाचा प्रचार करण्यासाठी हा झंजावाती दौरा इंडिया आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते व पदाधिकारी यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षांचे नेते व पदाधिकारी या दौऱ्यामध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते.