चौलच्या इतिहासाची साक्षीदार प्राचीन आसा मशिद दुरावस्थेत

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौलला ऐतिहासिक स्थान असून येथील पुरातन मंदिरे, वास्तू प्राचीन चौलच्या वैभवाचे साक्षीदार आहेत. चौल येथील राजकोट किल्ला मराठ्यांच्या हल्लात जमीनदोस्त झाला. मुसलमान अमदानीत चौल मध्ये प्रांताधिकारांचे मुूख्यालय असावे असे हमामखाना, हजामखाना, कबरस्तान, कलावंतीचा वाडा आदी अनेक वास्तूने सिध्द होते. चौल मुघल अमदानीत भक्तीस्थान असावे असे येथील दगडी बांधकामाची आसा मशिद पाहिल्यावर दिसून येते.

चौलनाक्यावरून आग्राव, शितळादेवीकडे जाताना काटकर आळीकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील हमामखान्याच्या काही अंतरावर कुंडलिका समुद्र खाडी किनारी लगत दगडी बांधकामाची आसा मशिदीचे अवशेष आहेत. चौल काटकर आळीतील नारळ सुपारीच्या बागायतीकडून या आसा मशिंदीकडे जाण्याचा मार्ग आहे. दगडी बांधकामाची आसा मशिदीचे पुर्णतः दुरावस्थेतील अवशेष आढळतात. या आसा मशिदीचे बांधकाम पाहिले असताना मुघल अमदानीत येथे भक्तीचे मोठे स्थान असावे असे दिसून येते.

आसा मशिद पुर्णतः भग्नावस्थेत असून तिचे दगडी बांधकामाचे अवशेष अद्यापी भक्कम स्थितीत आहे. आसा मशिदीचे उभ्या दगडी खांबावर कोरीव व रेखीव नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. आसा मशिदी पुर्णतः मोडकलीस व दुरावस्थेत असून, सुध्दा तिचे आठ ते दहा दगडी बांधकामाचे अवजड खांब प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आसा मशिदीच्या वरील बाजूस दगडी बांधकामाचा घुमट अद्यापी मजबूत दिसून येतो. ही आसा मशिद दोन मजली इमारतीची असावी असे तिचे दगडी बांधकाम पहाताना दिसते. आसा मशिदीच्या पाया सुध्दा दगडी बांधकामाचा असून, अद्यापी कणखर आहे. वरील बाजूकडील पडझड व दुरावस्थेने आसा मशिद मोडकलीस आली आहे. मात्र, आसा मशिदीचे बांधकाम प्राचीन बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून पहाण्यासारखा आहे. पुरातत्व खात्याचे या प्राचीन आसा मशिदीकडे दुर्लक्ष केले असल्याचे निश्चित जाणवते. या आसा मशिदीकडे जाण्याचा मार्गफलक तसेच येथे आसा मशिदी सभोवतालची झाडे झूडपे यांची सफाई केली, तर पर्यटक तसेच इतिहास प्रेमीना आसा मशिद पहाताना निश्चित प्राचीन इतिहासाच्या उत्कृष्ट बांधकाम पहाण्याचे भाग्य लाभेल.

Exit mobile version