वार्षिक परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्या

शिक्षकांचे गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

| खोपोली | प्रतिनिधी |

सन 2023-24 च्या संकलित मूल्यमापन 2 तसेच, इयत्ता 5 वी व 8 वीच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन वेळापत्रकानुसार दुपार सत्रात करण्यात आले आहे. परंतु, उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने सकाळ सत्रातच वरील दोन्ही परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचित ठरेल. दोन्ही परीक्षा सकाळ सत्रात घेऊन सर्व विद्यार्थ्यांची उन्हाच्या तीव्रतेपासून मुक्तता करावी, अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे खालापूर तालुकाध्यक्ष संदीप जाधव यांनी गटशिक्षणाधिकारी कैलास चोरामले यांची कार्यालयात भेट घेऊन दिले. त्याचबरोबर नवसाक्षर इन्कम टॅक्स, 16 नंबर आदी विषयांवर सविस्तर चर्चा करणण्या आली असून, या सर्व विषयास सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी सरचिटणीस दीपक पालकर, सल्लागार संतोष पाटील, कार्याध्यक्ष मारुती दासरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू, जिल्हा उपाध्यक्ष संदीप सुर्वे, समन्वयक कांचन कडू, जयश्री सुर्वे, केंद्र प्रतिनिधी शहाजी घायतीडक आदी उपस्थित होते.

Exit mobile version