कर्जत स्थानकाचे रुपडे बदलणार

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत रेल्वे स्थानकातील उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या यामुळे दाटीवाटी होत असते. ते लक्षात घेऊन रेल्वे मंडळाने कर्जत येथे कारशेड आणि उपनगरीय स्थानक बनविण्याचे काम मंजूर केले आहे. या उपनगरीय स्थानकाचे बांधकाम जोरात सुरु असून एकाचवेळी पनवेल कर्जत रेल्वे मार्ग तसेच कर्जत सबअर्बन स्थानक आणि कारशेड अशी तिन्ही कामे वेगाने सुरु असून या तिन्ही कामांवर देशाचे पंतप्रधान यांच्या मंत्रालयाचे लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

कर्जत रेल्वे स्थानकाचे लोकल गाड्यांचे फलाट पुढ्जील वर्षात नव्या ठिकाणी हलविले जाणार आहे. मुंबई पुणे मेनलाईन वरील कर्जत उपनगरीय लोकल स्थानक हे आता नव्या जागेत उभारले जात आहेत. मुंबई आणि पनवेल येथून येणाऱ्या उपनगरीय लोकल हे भविष्यात सध्या कर्जत स्थानकात जाणार नाहीत. त्या रेल्वे पुलाच्या बाजूला बनविण्यात येणाऱ्या सब अर्बन बांधले जात आहे. त्या ठिकाणी लोकल गाड्यांचे स्थानके बनविली गेल्यानंतर तेथे लोकल प्लॅटफॉर्म स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या एकाचवेळीउपनगरीय स्थानके आणि दुसरीकड़े कारशेड यांची कामे वेगांने सुरु आहेत. रेल्वे बोर्डाकडून गाड्यांचे कारशेड कर्जत येथे उभारले जाणार आहे. त्यासाठी मेन लाईन वरील भिवपुरी रोड स्थानकापासून मध्य रेल्वेच्या मार्गिकेपासून 100 मीटर एवढी जमीन हस्तांतरित करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तर पनवेल कर्जत रेल्वे मार्गातील शेत जमिनीचे अधिग्रहण रेल्वेकडून यापूर्वी करण्यात आले आहे. त्यामुळे सावरगाव पासून पुढे कारशेड आणि पनवेल कर्जत मार्गिका या दोन्ही बाजूने कामे वेगाने सुरु आहेत.

Exit mobile version