उरणच्या बाजारात मासळीची आवक वाढली

module: a; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Auto; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 53.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~25: 0.0;

खवय्यांकडून समाधान व्यक्त

| उरण | वार्ताहर |

सध्या समुद्रात मिळणार्‍या कोळंबी, पापलेट, सुरमई, हलवा, बला, मांदेली, बोंबील, जिताडा, माकुलसारख्या मासळीची आवक उरणच्या मच्छी मार्केटमध्ये वाढल्याने खवय्यांची खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. एकंदरीत, बंदी काळातही उरणच्या मच्छी मार्केटमध्ये समुद्रातील मासे उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शासनाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील मासेमारीला बंदी घातली आहे. परंतु, हा नियम मत्स्य विभाग परवाना अधिकारी व पोलीस यंत्रणा यांच्या कृपाशीर्वादाने करंजा, मोरा, दिघोडे, केळवणे, कोप्रोली, दादर, भाल या परिसरातील मासेमारी करणार्‍या बांधवांना लागू होत नसल्याने सदरचे मासेमारी करणारे लोक हे भरपावसाळ्यात आपापल्या बोटी समुद्रात घेऊन जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यांनी पकडून आणलेल्या मासळीची विक्री ही सर्रास उरणच्या मच्छी मार्केटमध्ये होताना दिसत आहे. एकंदरीत, बंदी काळातही ही उरणच्या मच्छी मार्केटमध्ये कोळंबी, पापलेट, सुरमई, हलवा, बला, मांदेली, बोंबील, जिताडा, माकुलसारखी समुद्रातील चविष्ट मासे उपलब्ध होत असल्याने मासे खवय्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version