सोन्याच्या पावलांनी गौराईचे आगमन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड शहरात गणेशोत्सवानंतर आता लाडक्या गौराईचे आगमन झाले आहे. शहर व परिसरातील महिला देवीची प्रतिकृती असलेले मुखवटे तसेच तेरड्याची रोपे घेऊन गौराईच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या. गुरूवारी (दि.17) “गौराई आली सोन्याच्या पावलांनी आणि गौराई आली माणिक-मोतीच्या पावलांनी,” असे म्हणत तब्बल साडेसहाशे गौराईंचे आगमन मुरूड शहरात झाले आहे. दरम्यान, गौराईच्या आगमनामुळे घराघरांत उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, शुक्रवारी (दि.18) गौराईची विधिवत पूजा थाटामाटात केली जाणार आहे. त्यासाठी महिलांनी घरांची स्वच्छता, सजावट तसेच पूजेची जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान, पारंपरिक पद्धतीने गौराईचे स्वागत करून विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.

Exit mobile version