इच्छुकांचे धाबे दणाणले

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

तालुक्यात पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात वडघर, कोन, पळस्पे, करंजाडे हे गण ओबीसी झाले आहेत. तर पोयंजे, वहाळ, गव्हाण, वावेघर, केळवणे, आपटा हे सर्वसाधारण राखीव झाले आहेत. त्यामुळे सर्व इच्छुकांनी आता लगेचच तयारीला सुरुवात केली आहे.

गेली काही वर्षे रखडलेल्या निवडणुका आता दारावर येऊन ठेपल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांचे आरक्षण जाहीर झाले असून, पनवेलमधील देखील जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पंचायत समिती गणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये पाली देवद अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव झाला आहे. नेरे आणि चिंध्रण हे अनुक्रमे अनुसूचित जमाती स्री आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत.वडघर, कोन नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी तर पळस्पे, करंजाडे हे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाले आहेत. वावंजे, आदई, वहाळ, वावेघर, आपटा हे सर्वसाधारण तर विचुंबे, पोयंजे, गव्हाण, केळवणे हे गण सर्वसाधारण स्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

जिल्हा परिषद गटामध्ये पनवेल तालुक्यातील आठपैकी वावंजे आणि वावेघर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव, तर केळवणे हा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाला आहे. नेरे गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. पाली देवद हा गट अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे. पळस्पे, वडघर आणि गव्हाण हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामुळे आता अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. ऐन दिवाळीत निवडणुकीचा रंग चढणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नेत्यांची तारांबळ उडणार आहे.

Exit mobile version