| यवतमाळ | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला. यात 4 कामगार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळालीआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार (दि. 28) यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे.
यासाठी भारी गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून, चार जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.