अलिबागचे भाकरीवाले पाटील ठरले ‘ सरस ‘

| रायगड | प्रतिनिधी |

मुंबई येथे देशातील नावाजलेले महालक्ष्मी सरस आयोजीत करण्यात आले होते. सदरच्या सरस प्रदर्शनात देशभरातून सुमारे 650 स्टॉलचे आयोजन उमेद,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजन करण्यात आले होते. सदरच्या प्रदर्शनात रायगड जिह्यातील 17 समूहांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनामध्ये अलिबागच्या भाकरीवाले पाटील समूहाने खाद्यपदार्थ विक्रीमध्ये ‘ सरस’ कामगिरी केल्याने उमेदमार्फत या समूहाचा सन्मान करण्यात आला. महालक्ष्मी सरस 2023-24 ला अनेक मान्यवर, दिग्गज मराठी व हिंदी कलाकार,खेळाडू,गायक आणि गायिका यांनी भेट दिली, सदर प्रदर्शनात संध्याकाळी विविध सेलिब्रिटी यांचे मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन उमेद मार्फत करण्यात आले होते. महाराष्ट्राची हास्य जत्रा , वैशाली माडे,सूनिधी चौहान सारख्या नावाजलेल्या गायिकेंचे गाण्याचे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.

या प्रदर्शनात महाराष्ट्राची खाद्य संस्कृतीची दुकाने होती. यामध्ये हातावरचे मांडे, पुरणपोळी , थालीपीठ, मच्छी थाळी, कोंबडी वडे , सावजी चिकन मटन, बाहेरच्या राज्यातील खाद्य पदार्थांची दुकाने लावण्यात आली होते. यामध्ये अलिबागच्या भाकरीवाले पाटील यांच्याकडील कोंबडी वडे, सुरमई फ्राय , पापलेट फ्राय, सोलकडीचा सर्वांनी आस्वाद घेतला. काही मुंबईकरांनी तर स्पेशल कोंबडी वडे आणि अस्सल मच्छी फ्रायचा आस्वाद घेण्यासाठी दोनवेळा भाकरीवाले पाटील समूह यांच्या दुकानाला भेट दिली. त्यांच्या प्रचंड प्रदिसाद मुळे सर्वाधिक खाद्य पदार्थ विक्री करण्याचा विक्रम अलिबागच्या भाकरीवाले पाटील समुहाने केला.

उमेद अभियानामार्फत भाकरीवाले पाटील समूहाचा यथोचित भेट वस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भारत बस्तेवाड , प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समुहाने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.यावेळी उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल सिद्धेश राऊळ यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी महिला समन्वयक उज्वला जगताप त्यांचाही उमेद अभियनामार्फत सन्मान करण्यात आला.

Exit mobile version