कृषीवलच्या दणक्याने सुकेळी खिंडीतील खड्डे बुजविले

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीतील दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या उतारावर चार फूट खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याची बातमी (दि.11) कृषीवल वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्यानंतर दोन दिवसांनी सुकेळी खिंडीतील खड्डे भरण्यात आले आहेत. खड्ड्यांपासून दिलासा मिळाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांनी कृषीवलचे आभार मानले आहेत.

महामार्गावरील पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम गेली 13 वर्षांपासून सुरु असून, या कामात कोणतेही प्रगती नाही. या महामार्गावर भयानक खड्डे पडले आहेत; परंतु ज्या ठिकाणच्या खड्ड्यांची बातमी वृतपात्रातून प्रकाशित होते, त्याच ठिकाणचे खड्डे भरले जात आहेत. बाकी खड्डे तसेच आहेत. याचा अर्थ, वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित झाली तरच रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते दिसतात काय, असा खडा सवाल प्रवाशांतून केला जात आहे.

Exit mobile version