क्रिकेटमध्ये नव्या युगाची नांदी

इलेक्ट्रा स्टंपचा होणार वापर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नव्या युगातील स्टंप्सने क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 लीग ‌‘बिग बॅश लीग’ मध्ये हे नवे स्टंप पाहायला मिळाले आहेत. त्यांना इलेक्ट्रा स्टंप असे नाव देण्यात आले आहे. या स्टंपचे वैशिष्ट्यं म्हणजे, ते चौकार-षटकारांपासून नो बॉलपर्यंत प्रत्येक बाबतीत वेगवेगळे रंग दाखवतील. हे सर्व रंगदेखील अतिशय आकर्षक दिसतात.

‌‘इलेक्ट्रा’ स्टंपने बिग बॅश लीग (बीबीएल 2023) मध्ये पदार्पण केले आहे, जे पूर्वी महिला बीबीएलमध्ये वापरले गेले होते. अंपायरचा निर्णय सूचित करण्यासाठी हे स्टंप वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि रंगांच्या संयोजनात चमकतात. हे निर्णय नो-बॉल, विकेट, बाऊंड्री किंवा षटकांमध्ये टाईम आऊटचे देखील आहेत. शुक्रवारी (22 डिसेंबर) बिग बॅश लीगच्या सामन्यापूर्वी मार्क वॉ आणि मायकेल वॉन यांनी या स्टंपबद्दल तपशीलवार माहिती दिली. मायकेल वॉनने सांगितले की, हे स्टंप महिलांच्या बिग बॅशमध्ये वापरले गेले आहेत, परंतु पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यानंतर मार्क वॉने या स्टंपची वैशिष्ट्‌‍ये सांगितली.

विकेट: कोणताही खेळाडू बाद झाला, मग तो कोणत्याही प्रकारे आऊट झाला तरी या स्टंपमध्ये लाल लाईटीसह ज्वाळांसारखे रंग दिसतील.
चौकार: चेंडू बॅटला लागून सीमारेषेला स्पर्श करताच, या स्टंपमध्ये विविध प्रकारच्या लाइट्स वेगाने सरकताना दिसतील.
षटकार: जेव्हा चेंडू बॅटला लागल्यानंतर थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचतो, तेव्हा या स्टंपवर वेगवेगळे रंग सरकताना दिसतील.
नो बॉल: नो बॉलसाठी अंपायरच्या इशाऱ्यानंततर या स्टंपवर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लाइट्स सकरताना दिसतील.
षटकांदरम्यान: एक षटक संपल्यानंतर दुसरे षटक सुरु होईपर्यंत जांभळ्या आणि निळ्या लाइट स्टंपवर चालू राहतील.
Exit mobile version