। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतासह 22 देशांमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण दिसत आहे. संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटं ते संध्याकाळी 5 वाजून 42 मिनिटांपर्यंतच्या कालावधीमध्ये दिसणारं हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय आकाशात पाहत आहेत.

भारतामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये दिल्ली, जम्मू कश्मीर, अमृतसर, मुंबईमध्ये ग्रहण लागलेला सूर्य नागरिक पाहत आहेत. पुढील एक-दीड तास हे ग्रहण राहणार आहे. हे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आहे. कृषीवलचे फोटोग्राफर श्रेया फोटो यांनी अलिबागमधील सुर्यग्रहणाची दृश्ये टिपली आहेत.