कबड्डीतून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत- पंडित पाटील

| अलिबाग | हिरामण भोईर |

लाल मातीतील रांगड्या कबड्डी खेळातून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी गुरुवारी येथे केले. ते राजू समजीसकर मित्र मंडळ बांधण यांच्या संयोजनाखाली आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या किशोर व किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास सतीश भाऊ केळशीकर,टायगर ग्रुप उपाध्यक्ष ठाणे, गोल्डन मॅन संदेश पवार, मुंबई पीएसआय नरेंद्र बेलदार, मंडळाचे प्रमुख राजू समजीसकर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी जे.जे. पाटील, हिराचंद पाटील, जगदीश पाटील, संजय मोकल, नरेश म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, लक्ष्मण गावंड, जनार्दन पाटील, गजानन मोकल, प्रफुल्ल पाटील, पांडुरंग पाटील, पंच मंडळाचे सुहास पाटील, विनोद पाटील, मदन पाटील, अनिल राऊत, प्रथमेश पाटील, रमाकांत पाटील, अजिंक्य पाटील आदी मेहनत घेत आहेत.

या स्पर्धेतून निवडले जाणारे संघ लातूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत 64 मुलांचे आणि 16 मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.

Exit mobile version