कोलाड नाक्यावरून दुचाकी चोरीला

पोलिसात गुन्हा दाखल
। कोलाड । वार्ताहर ।
कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबेवाडी नाक्यावरून शनिवार सकाळच्या सुमारास दुचाकी मोटार सायकल चोरीला गेली असून, तक्रारी नंतर पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी रा. संभे ता.रोहा यांचे ताब्यातील मोटर सायकल आंबेवाडी गावाच्या हद्दीत सरकारी दवाखान्याच्या समोरून एमएच 06 सीसी 4885 ही 40 हजार रूपये किंमतीची मोटार सायकल फिर्यादी यांच्या संमती शिवाय अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 99/2021 भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कोलाड सपोनी सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोना/2380 एस.ए.विघ्रे हे करीत आहेत.

Exit mobile version