| पाताळगंगा | वार्ताहर |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर हाळ गावाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गवरून खोपोलीहून पनवेलकडे ओंकार सुभाष आडकर (रा. विनानगर-खोपोली) हा युवक आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी घेऊन जात होता. तो हाळ गावाजवळ आला असता दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अज्ञात वाहन अपघात करून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या युवकाच्या मृतदेहावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेद करण्यात आले.