चिल्हार नदीत वाहून गेलेल्या तरुण- तरुणीचे मृतदेह सापडले

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील स्पर्श रिसॉर्टवर पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटक चिल्हार नदीत वाहून गेले होते. रविवारी दुसर्‍या दिवशी 24 तासांनी या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह चिल्हार नदीत सापडले असून हे दोघेही अविवाहित तरुण तरुणी आहेत.

पनवेल कळंबोली येथील बळवंत सिंग आणि मुंबई येथील निकिता माणगावकर हे दोघे एकाच ठिकाणी काम करणारे असलेले हे दोघे अविवाहित तरुण चारचाकी वाहनाने 20 ऑगस्ट रोजी कशेळे जवळील स्पर्श रिसॉर्ट मध्ये पर्यटनासाठी आले होते.तेथील रिसॉर्ट मध्ये मौजमजा केल्यानंतर ते दोघे 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चेक आऊट करून रिसॉर्टच्या बाहेर पडले.त्यानंतर पुन्हा दोन वाजता ते दोघे आपल्याला फार्म हाऊस बुक करायचे आहे आणि त्यासाठी साईट पहायची आहे असे सांगून पुन्हा एकदा रिसॉर्ट मध्ये पोहचले. त्यावेळी ते गाडी पार्क करून त्या फार्म हाऊस सोसायटी मध्ये फिरत होते.त्यानंतर सोसायटीच्या एका भागातून चिल्लार नदी वाहत असून नदीच्या कडेला खडकावर बसून मद्यपान करीत होते.साधारण चार वाजता तेथील सुरक्षा रक्षक यांच्या लक्षात त्या दोन पर्यटकांबद्दल संशय आला.त्यामुळे दोन सुरक्षा रक्षक हे फार्म हाऊस सोसायटी मध्ये शोध घेत असताना चिल्लार नदीच्या कडेला खडकावर त्यांची बॅग आणि कपडे आढळून आले.त्यामुळे बळवंत सिंग कुलवंत सिंग आणि निकिता माणगावकर यांचा शोध सुरू झाला.मात्र ते नदीमध्ये वाहून गेले आहेत याबद्दल कोणालाही कोणतीही माहिती नव्हती.परंतु पाच वाजण्याच्या सुमारास सुगवे येथे पुलावर काही गुराखी तरुण होते आणि त्यांना एक तरुणाचा मृतदेह नदीच्या पाण्यातून वाहून जाताना दिसला.त्या तरुणांनी त्या मृतदेहाचे आपल्या कडील मोबाईल वरून शूटिंग देखील केले.मात्र गेली दोन दिवस पाऊस पडत असल्याने चिल्लार नदी काठोकाठ पाण्याने भरून वाहत असल्याने त्या गुराखी तरुणांनी पाण्यात उडी घेण्याचा प्रयत्न केला नाही. सायंकाळी सात वाजता पोलीस त्या ठिकाणी पोहचले,परंतु काळोख पडल्याने कोणताही मृतदेह सापडला नव्हता. 22 ऑगस्ट रोजी कर्जत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने चिल्हार नदीमध्ये नालधे गावापासून पुढे सुगवे,गुडवण,आंथ्रट,पिंपळोली गावापर्यंत नदीच्या किनारी शोध कार्य सुरू केले.दुपारी अडीच वाजता सुगवे गावच्या हद्दीत 25 वर्षीय निकिता माणगावकर या तरुणीचा मृतदेह सापडला तर त्याच काळात गुडवण आणि आंथ्रट या गावांच्या मध्ये चिल्हार नदीत बळवंत सिंग या तरुणाचा मृतदेह सापडला असून पोलीस निरीक्षक अरुण भोर तेथे उपस्थित होते.नदीच्या पाण्यात वाहून जाणारे हे दोघे या वर्षातील सहावे बळी ठरले आहेत.या आधी पोश्री नदीत कळंब येथे दोघे तर उल्हासनदीत दामत येथे दोघे नदीत वाहून गेले आहेत.तर पाली भूतीवली धरणात तिघांचा यावर्षी बुडून मृत्यू झाला आहे.

विना परवाना रिसॉर्ट
कशेळे जवळील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीत नालधे येथे स्पर्श फार्म हाऊस सोसायटी आहे.स्पर्श हा बंगले प्रोजेक्ट असून 60 च्या आसपास बंगले असलेल्या या फार्म हाऊस सोसायटी मध्ये क्लब हाऊस आणि रिसॉर्ट बंगले मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष थॉमस हे चालवतात.ते रिसॉर्ट कोणत्याही प्रकारचे परवाने न घेता सुरू असून फार्म हाऊस सोसायटी मधील क्लब हाऊस आणि रिसॉर्ट हे केवळ सोसायटी मधील बंगले धारक यांच्यासाठी बनवलेले असते.मात्र बंगले मालक संघटनेचे अध्यक्ष थॉमस हे तेथील रिसॉर्टचा व्यवसायीक वापर करीत आहेत.त्यात बोरिवली ग्रामपंचायत किंवा प्रशासनाची कोणतेही परवानगी या रिसॉर्टला व्यवसाय करण्यासाठी देण्यात आलेली नाही.

Exit mobile version