कुजलेल्या अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील कुंभारशेत जांभुळमाळ गावाच्या जंगलामध्ये एका अज्ञात इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.एन. गायकवाड यांनी माहिती दिली. या मृत पुरुषाचे (वय45) वर्ष, उंची अंदाजे पाच फूट आहे. अंगाने सडपातळ, अंगावर लाल रंगाचे अंतर्वस्त्र त्यावर इंग्रजीमध्ये -डच–ऋरीहळेप असे निळ्या अक्षरात नाव आहे. तरी या मृत व्यक्ती संदर्भात कोणाला अधिक माहिती असेल किंवा कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी पाली पोलीस स्थानकात संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. गायकवाड यांनी केली आहे.

Exit mobile version