। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-पुणे जुन्या हायवेवरील चिखले बस स्टॉपजवळ पनवेल तालुका पोलिसांना 50 ते 55 अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत. त्याचा रंग सावळा, डोक्याचे केस काळे, पांढरे वाढलेले आहेत. त्याची उंची 165 सेंटीमीटर असून, अंगात फुल बाह्यांचा पांढर्या रंगाचा शर्ट व निळा रंगाची फुल पँट घातलेली आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर यांच्याशी संपर्क साधावा.







