अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

| रसायनी | वार्ताहर |
वाशिवली गावच्या हद्दीतील नंदलाल ठक्कर गोडाऊनसमोरील लोहोप सिध्देश्‍वरी कॉर्नर या रस्त्यालगत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती तेथील पोलीस पाटील मोहन पाटील यांनी रसायनी पोलिसांना दिली. सदर महिला गुरुवार, 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आढळून आली असून, तिच्या नातेवाईकांचा तपास पोलीस घेत आहेत. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ बप्पाजी खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Exit mobile version