मृतांचा आकडा 15 वर
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल बोटीचा बुधवारी (दि.18) अपघात झाला होता. तीन दिवसांचा कालावधी उलटूनही मात्र अपघातात बुडालेल्या मृतांचा शोध अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत 14 मृत व्यक्तींचा शोध लागला होता. मात्र, सात वर्षांचा मुलगा जोहान निसार अहमद हा बेपत्ता होता. अखेर तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शनिवारी (दि. 21) सकाळी बेपत्ता असलेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. त्याच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते.