| पुणे | प्रतिनिधी |
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं. आज ते बारामती दौऱ्यावर होते. अजित दादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी ठरली. अजित दादा पवार ज्या विमानात होते, ते विमान आकाशात घिरट्या घालत होतं. त्यानंतर विमान जोरात कोसळलं. विमानाचा भयंकर स्फोट झाला. विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. तसेच विमानातील काही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या हातातील घड्याळ त्यांची शेवटची ओळख असल्याचं सिद्ध झाले आहे.





