| अलिबाग | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक कवी, लेखक डॉ. विजय हिरामण कोकणे यांचे समाजकार्य- एक कलात्मक कौशल्य शास्त्र हे लेखक म्हणून सातव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शुक्रवारी (दि.06) रोजी जन शिक्षण संस्थान रायगड पर्यावरणपूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सहाण-अलिबाग येथे पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नितीन गांधी यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात आलेले असून हे त्यांचे पाचवे प्रकाशन आहे.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर, डॉ. विजय कोकणे, नरेन जाधव, ॲड. नीला तुळपुळे, गितांजली ओक, संजय राऊत, माधवी खेबूडकर, हिरामण कोकणे, डॉ. आशा कोकणे, सुमन कोकणे, वेदांत कोकणे, सचिन चव्हाण, उज्ज्वला चंदनशिव, डॉ. राजाराम हुलवान, रुपेश दांडेकर, मुकुल खेबूडकर, पंडित ढमढेरे, अनिलकुमार बेल्हेकर, अरविंद कर्णिक, प्रिया कर्णिक, जयश्री ढमढेरे, विनायक देशपांडे, सुजाता देसाई, विद्या पाठारे, प्रतिक्षा चव्हाण, कल्पना म्हात्रे, अक्षता जामकर तसेच कर्मचारी यांच्या मुख्य उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. माधवी खेबूडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






