चार चाकी आणि मोटासायकलसह कोसळला पुल
I अलिबाग I भारत रांजणकर I
अलिबाग मुरुड मार्गावरील काशीद येथील जीर्ण पुल खचल्याने रात्री 8 च्या सुमारास कोसळला. दरम्यान या पुलावरून मोटासायकल तसेच एक चारचाकी वाहन जात होते. त्यामुळे जीवित हानी तसेच काही जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काशीद येथील हा पुल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज हा पुल कोसळला. सदर पुलावरून त्याच वेळी जाणाऱ्या मोटासायकल वरील एक जण सुखरूप बाहेर आला. मात्र एक जण बेपत्ता असल्याचे समजते.
