नांदगाव ते दिघेवाडी मार्गावरील पुलाला भगदाड

ग्रामस्थांकडून दुरूस्तीची मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील नांदगाव ते दिघेवाडी रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पुलाची पाहणी करून प्रशासनाकडे दुरूस्तीची मागणी केली आहे. हा पूल कमकुवत व धोकादायक झाला असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे.

येथील दिघेवाडी, गोंडाळे, खरबाचीवाडी, हंडेवाडी अशा चार गावांना हा पुल जोडतो. या पुलाला 38 वर्ष झाली असून अनेक वर्ष याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानचे दुर्लक्ष आहे. पावसाळ्या अगोदर या कमकुवत पुलाची डागडुजी देखील केली नसल्याने या पुलाला मोठे भगदाड पडले असून पुल कमकुवत व धोकादायक बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाला भगदाड पडल्याची माहिती ग्रामस्थांनी कळवताच सुधागड तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पुलाची पाहणी केली व संबंधित खात्याला याची माहिती दिली.

नांदगाव ते दिघेवाडी मार्गावरील हा पूल 1984 साली बांधण्यात आला असल्याने तेथे नवीन पूल बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच नवीन पूल मंजूर झाला असल्यामुळे या जुन्या पुलाची डागडूजी करता येत नाही.

दिलीप मदने, शाखा अभियंता
Exit mobile version