चाफेवाडी येथील पोश्री नदीवरील पुल धोकादायक

। नेरळ । वार्ताहर ।
चाफेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या मागील बाजूने वाहणार्‍या पोश्री नदीवर बांधण्यात आलेल्या पूल धोकादायक बनला आहे.कर्जत या तालुक्याचे ठिकाणापासून 25 किलोमिटर अंतरावर वसलेले गाव व वाड्याना जोडणारा चाफेवाडी नदिवरील पुल अखेरचा श्‍वास घेत अशुभ या भागातील रस्ते सुद्धा जीव घेणे खड्डेमय झाले आहेत.

खांडस-नांदगाव रस्त्यवर पोश्री नदीवर असलेला चाफेवाडी पुल नादुरुस्त झाला आहे.या पुलाची निर्मिती 25 वर्षांपूर्वी झाली होतो आणि पुलाची अवस्था खुपच खराब झालेली आहे.पुलावर डांबर राहिली नाही आणि मोठे खड्डे पडून पुलाच्य लोखंडि सळया बाहेर दिसू लागले आहे.मोठे वाहन या पुलावरून जात असताना पुल हालतो असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चाफेवाडी- नादगाव भागातील ग्रामस्थ यांना पुलाची दुरुस्ती कधी होईल याची प्रतिक्षा आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी याची मागणी चाफेवाडी – नादगाव भागातील ग्रामस्थ शासकीय प्रशासना कडे करत आहेत.

या पुलाची कोट तुटलेला आहे,साईट वॉल खचलेले आहेत पुलावरून वाहन जात असताना पुल हालतो. या पुलावरून जीवघेणे प्रवास या पुलावरून करावा लागतो.या पुलाकडे लक्ष नाही दिले तर या पुलावर मोठा अपघात होऊ शकतो. सरकारी प्रशासनाकडे 10 वर्षा मागणी करून सुद्धा या पुलाकडे दुर्लक्ष केले जाते.प्रल्हाद गोपणे-उपअभियंता, बांधकाम विभाग रायगड जिल्हा परिषद
या पुलाची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मे 2021मध्ये बांधकाम विभागाकडे पाठवला आहे.पावसाळ्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम अपेक्षित आहे.

Exit mobile version