लोकसभा निकाल लागताच महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचे (दि.10) जूनला मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ (दि.7) जुलैला संपत आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी (दि.10) जूनला मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार (दि.10) जूनला मतदान होणार असून (दि.13) जूनला मतमोजणी होईल.
कशी असणार निवडणूक प्रक्रिया? निवडणुकीची प्रक्रिया (दि.15) मे पासून सुरू होणर आहे. इच्छुक उमेदवारांनी (दि.22) मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी (दि.24) मे रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल तर (दि.27) मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.
कोणत्या चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार? | ||
विलास विनायक पोतनीस | मुंबई पदवीधर | |
निरंजन वसंत देवखरे | कोकण पदवीधर | |
किशोर भिकाजी दराडे | नाशिक शिक्षक | |
कपिल हरिश्चंद्र पाटील | मुंबई शिक्षक |
पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.