आदित्य ठाकरेंचा आरोप; ईडी सरकारवर हल्लाबोल
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्यावरुन मविआने सत्ताधारी ईडी सरकारवर एकच हल्लाबोल केला. रायगडात होणारा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्पही गुजरातमध्ये जाणार असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत केला आहे.
रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहले होते. सुभाष देसाई यांनी त्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. मात्र, केंद्र सरकाराने गुजरात, आंध्रप्रदेश आणि हिमाचलला बल्क ड्रग पार्कबाबात विचारणा केली आहे. त्यात आता गुजरातमधील भरूचमध्ये हा बल्क प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांत समुहाचे मालक अनिल अग्रवाल यांच्याबरोबर बैठक घेतली होती. सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत, त्या निश्चित देईल असे त्यांना सांगितले होते. तळेगावजवळ 1100 एकर जमीन देऊ केली होती.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना गुजरातऐवजी महाराष्ट्रामध्ये उभारण्यासंदर्भातील सर्व प्रयत्न करावेत. राजकीय दबावामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला धक्का देणारा आहे.
अजित पवार, विरोधी पक्षनेते