पालीतील तो जळीत कारखाना बंद होणार

नगरपंचायतची मालकाला नोटीस
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती. या घटनेची दखल घेत बुधवारी (दि.4) पाली नगरपंचायतीने ङ्गइंडियन व्हेस्क फेम पार्टनरफ या कारखान्याच्या मालकांना नागरी वस्तीतील कारखाना (आस्थापना) बंद करण्यासंबंधी पत्र दिले आहे. या पत्रात म्हंटले आहे की महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम नियम-2006 च्या अनुषंगाने चालवत असलेली आस्थापना आवश्यक त्या उपायोजना करण्यास अपयशी ठरल्याचे निदर्शनास आलेले आहे. या कारखान्यामुळे सार्वजनिक जीवीतास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे नोटिस मिळाल्या पासून आपली हा कारखाने सांगितलेल्या उपाययोजना करेपर्यंत व सक्षम प्राधीकरणाच्या सर्व परवानग्या घेऊन योग्य त्या उपाययोजना करे पर्यंत बंद ठेवण्यात यावा. आणि आपला कारखाना (आस्थापना) नागरी वस्तीतून बाहेर काढण्यात यावा असे पत्रात नमूद केले आहे.

Exit mobile version