गोव्याकडे जाणार्‍या बसने घेतला पेट

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
गोव्याच्या दिशने निघालेल्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना एडगाव पाष्टेवाडी येथे घडला आहे. या अपघातात प्रवाशांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्याहून गोव्याकडे निघालेली आरामबस (क्रमांक जीए-03,डब्ल्यु-2518) करूळ घाटातून उतरल्यानंतर पहाटेच्या सुमारास 30 प्रवाशांसह एडगाव पाष्टेवाडी येथे आली असता या गाडीने अचानक पेट घेतली. गाडीतून धूर येण्यास सुरूवात झाल्यामुळे चालकाने गाडी थांबविली. चालकाने गाडीतून उतरून पाहील्यानंतर गाडी पेटण्यास सुरूवात झाली होती. त्याने आरडाओरडा करीत प्रवाशांना गाडीतून तत्काळ खाली उतरण्यास सांगितले. झोपेत असलेले प्रवाशी खडबडून जागे होत आपले सामान तिथेच सोडून गाडीतून खाली उतरले.
आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला परंतु आग विझली नाही. पहाटेच्या या प्रकाराने एकच खळबळ माजली.पोलिसांना ही माहीती मिळाल्यानंतर वैभववाडी पोलीस घटनास्थळी पोहचून पुढील कारवाई केली.

Exit mobile version