| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड-साळाव रस्त्यावर कोटेश्वरी मंदिर दरम्यान वळणावर रस्त्यालगत असलेली झुडपे धोकादायक असून सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी शिवसैनिक वसीम शेखानी यांनी केली आहे.
या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटेश्वरी मंदिर रस्त्यावर वळणालगत अनेक महिन्यांपासून झाडाझुडपांचा विळखा असून समोरुन येणारे वाहन दिसून येत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून येथील झुडपांचा विळखा हटविण्यात यावा, अशी मागणी वसीम शेखानी यांनी केली आहे.