नांदेड | प्रतिनिधी |
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.यासाठी गुरुवारी जाहीर प्रचार थंडावला.या निवडणुकीची 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात 2009च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण 2014 च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. 2019मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.