• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्वविजेतेपदाची मोहीम सुरू!

Santosh Raul by Santosh Raul
October 9, 2023
in क्रीडा, चेन्नई, देश, नवी दिल्ली
0 0
0
विश्वविजेतेपदाची मोहीम सुरू!
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तिसऱ्या विश्वचषक विजेतेपदासाठीच्या मोहिमेला भारताने चेन्नईतून विजयाने आरंभ केला. अपेक्षेप्रमाणे भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकूटाने विजयासाठीचे आव्हान 200 धावसंख्येवर मर्यादित ठेवले. मात्र, या अल्प आव्हानाचा पाठलाग करताना विश्वविजेते होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताची धावसंख्या 3 बाद 2 अशी होती. हे लक्षण चांगले नाही. मात्र, त्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि के.एल. राहुल यांची 165 धावांची भागिदारी भारतीय क्रिकेटपटूंच्या क्षमतेची ताकद दाखविणारी होती. चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता. चेंडूची लकाकी टिकेपर्यंत तो गोलंदाजांना साथ देणारा होता. मात्र, एकदा का लकाकी गेली आणि सायंकाळी दव पडायला सुरूवात झाली की, मग गोलंदाजांची कसोटी होती. पण, सुरुवातीची 10-12 षटकेच खेळताना भारताने कर्णधारासह तीन मोहोरे गमाविले.

भारतीय संघाला अद्याप चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज कोण, हे ठामपणे ठरविता आलेले नाही. चेन्नईत त्यांनी श्रेयस अय्यरला खेळविण्याचा केलेला प्रयोग सपशेल अपयशी ठरला. सलामीपासून मधल्या आणि त्याखाली फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला यावेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय तो यष्टीपाठीही उभा असतो. मधल्या फळीत खेळण्याचे प्रयोजनच ते होते की, यष्टीरक्षणामुळे आलेल्या थकव्यानंतर किंचित खाली फलंदाजीला यायचे.

विराट कोहली हा संघातील सर्वाधिक अनुभव फलंदाज आहे. एका बाजूला नांगर टाकून तो उभा होता. अनेकदा ‌‘बीट’ही झाला. एकदा तर त्याचा झेलही सुटला. पण, तरीही तो अविचल राहिला. परंतु, त्यापेक्षा कौतुक राहुलचे वाटते. आजारपणातून, दुखापतीतून तो नुकताच बाहेर आलाय. संघासाठी एक ते सात क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करायची त्याची तयारी आहे. संघासाठी त्याने यष्टीरक्षणाचे ग्लोव्हजही घातले आणि एक फलंदाज अधिक खेळविण्याची संधी भारताला दिली. या राहुलने कोहलीला आत्मविश्वास दिला. कारण, समोरुन विकेट पडत असतील, तर कोणताही प्रतिथयश फलंदाजदेखील शांत डोक्याने फलंदाजी करु शकत नाही. राहुलने पाचवाच चेंडू ज्या पद्धतीने कव्हर्समधून सीमापार पाठविला, त्यावरुन चेन्नईची सायंकाळ त्याची होती हे सूचित होत होते. आणि विराट कोहलीचा हेझलवूडच्या गोलंदाजीवर उडालेला सोपा झेल जेव्हा मिशल मार्शने सोडला, तेव्हा आजचा दिवस भारताचा आणि विजय आपलाच होणार हेही सूचित होत होतं. ऑस्ट्रेलियाने राहुलच्या स्वेअरकटसाठी झंपा या लेगस्पिनरला राखून ठेवला होता. झंपाची गुगली राहुलचा त्रिफळा उद्ध्वस्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सापळा लावला. थर्डमॅन सीमारेषा मोकळी ठेवून राहुलला या सापळ्यात पकडण्यासाठीचे आमिष दाखविण्यात आले. पण, राहुलने झंपाच्या पहिल्याच षटकात दोन स्क्वेअरकटचे चौकार मारले आणि आपण या सापळ्याला घाबरत नाही, हे दाखवून दिले. त्याच षटकातील त्याच्या कव्हर्समधील चौकाराने झंपाच्या लेग ब्रेक गुगली गोलंदाजीची लयच बिघडवून टाकली.

ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्धच्या युद्धातील हे अस्त्र राहुलने असे बोथट केले होते. राहुलने मग स्टार्क, हेझलवूड या ऑस्ट्रेलिया दोन भेदक गोलंदाजांची गोलंदाजीही सहज खेळून काढली. त्याचे चौकार आणि दोन षटकार त्याच्या समयोचित आणि परिपक्व अशा 97 धावांच्या नाबाद खेळीची साक्ष देत होते. कोहली आणि हेझलवूड यांच्यातील संघर्ष मात्र त्यावेळी प्रेक्षकांची अधिक करमणूक करीत होता. संथ खेळपट्टीवरदेखील हेझलवूडने बाऊन्सर्सचा कल्पक वापर केला. त्यातील एक कोहलीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर मात्र हेझलवूडविरुद्धच्या युद्धात कोहलीने हाराकिरी केली. एक आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटवर सोपा झेल दिला. तोपर्यंत सामना भारताच्या हातात आला होता. कोहलीचे काम संपले होते.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलामीची लढत जिंकून विश्वचषक विजयाच्या मोहिमेला भारताने सुरूवात केली. या मोहिमेदरम्यान येणाऱ्या अनेक संकटांपैकी एका संकटाची झलक आपण पाहिली. 3 बाद 2 या धावसंख्येवरुन मिळविलेला विजय कौतुकास्पदच म्हणावा लागेल. परंतु, ऑस्ट्रेलियापेक्षा तगडे आणि धूर्त प्रतिस्पर्धी या स्पर्धेत आहेत. त्यांचा सामना करताना आपल्या संघाला अधिक सज्ज व्हावे लागेल.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newssportssports newsvinayak dalvi
Previous Post

मोर्बा येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण

Next Post

‘हाय-फ्लायर’ प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा खेळाडू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

April 1, 2026
श्रेयांशची विजयी घोडदौड
क्रीडा

श्रेयांशची विजयी घोडदौड

April 1, 2026
शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज
क्रीडा

शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज

March 31, 2026
एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती
उरण

एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती

March 31, 2026
पुण्यात रंगला उपांत्यपूर्व फेरीचा थरार
क्रीडा

विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

March 31, 2026
Next Post
‘हाय-फ्लायर’ प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा खेळाडू

'हाय-फ्लायर' प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा खेळाडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?