कारची रिक्षाला धडक

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव कारची रिक्षाला धडक लागल्याची घटना उलवे येथे घडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला आहे. उलवे सेक्टर 16 येथे हा अपघात घडला. रिक्षाचालक रमेश माने हे उलवेकडे महिला प्रवासी घेऊन चालले होते. यावेळी कारने अचानक उजवीकडे वळण घेतले. यामुळे कारची रिक्षाला धडक बसून माने यांना दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार केली असून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version