| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पार्क केलेल्या चार चाकी कारच्या दरवाजाची काच फोडून चोरट्याने काळ्या रंगाची बॅग आणि त्यामधील एक लाख रुपये चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.17) गुन्हा दाखल करण्यात आला. विकी महिंद हे सुकापुर भूमी कॉम्प्लेक्स येथे राहत असून, 16 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते वॅगन आर कारमधून ओरायन मॉल पनवेल येथे सिनेमा पाहण्यासाठी गेले. त्यांनी मॉलच्या समोरील सर्विस रोडवर गाडी पार्क केली. त्यावेळी त्यांनी एक लाख रुपये, दुकानाच्या चाव्या ह्या बॅगमध्ये ठेवल्या आणि बॅग कारच्या पाठीमागील सीटच्या समोरील भागात ठेवली. सिनेमा संपल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ते कार जवळ आले. यावेळी कारच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. चोरांनी एक लाख रुपये चोरून नेले.







