जोगेश्‍वरी मातेचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा

शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांच्या सूचना
| नागोठणे | प्रतिनिधी |
श्री जोगेश्‍वरी मातेचा पालखी उत्सव हा सर्व ग्रामस्थांचा आनंदाचा सोहळा आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या या पालखी सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये व पालखी सोहळा विनासायास, निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची व सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. त्यामुळेच पालखी सोहळ्यात संपूर्णपणे बंदी घालण्यात आलेला डिजे, लाऊड स्पीकर वाजविण्यासह पालखी अडविल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागोठण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिला.

नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्‍वरी मातेच्या 7 एप्रिलला होणार्‍या चैत्रोत्सव पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्यात 31 मार्चला सायंकाळी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत उत्सव समिती, ग्रामस्थ व पत्रकारांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला श्री जोगेश्‍वरी माता देवस्थान विश्‍वस्त समितीचे सचिव भाई टके, माजी सरपंच विलास चौलकर, जोगेश्‍वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, सचिव मंगेश कामथे, खजिनदार प्रथमेश काळे, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्‍वर साळुंखे, राजेश पिंपळे, राजा गुरव, जगदीश चौलकर, शंकर भालेकर, मनोज वाघमारे, नारायण तेलंगे, प्रणव रावकर, संतोष पाटील, नरेश भंडारी, केतन भोय, किरण काळे, प्रमोद नागोठणेकर, राजू नाकती, पो.हे.कॉ. विनोद पाटील आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version