छत्रपती शिवाजी महाराज चषक प्रमोद इलेव्हनने पटकावला

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धेत प्रमोद 11 बंड्या बॉईज क्रिकेट संघ अंतिम विजेता संघ ठरला आहे. तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना प्रमोद 11 बंड्या बॉईज क्रिकेट संघ विरुद्ध गोल्डन स्टार क्रिकेट संघ यांच्यामध्ये रंगला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा वीर भाई कोतवाल क्रीडा संकुलामध्ये संपन्न झाला. पारितोषिक वितरण सोहळ्यात मैत्री प्रतिष्ठान तर्फे माथेरानमधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. स्पर्धेसाठी उद्योजिका रेखा चौधरी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शिंदे आणि नगरसेवक किरण पेमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत मोलाची साथ दिली.

Exit mobile version