आज संध्याकाळी मुंख्यमंत्री देणार राजीनामा

। मुंबई । प्रतिनिधी ।
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. शिंदे परत यावेत यासाठी गेले दोन-तीन दिवस विविध मार्गाने प्रयत्न झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही शिंदे यांना परतीचे आवाहन केले, मात्र शिंदे यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे आता महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करणे आव्हानात्मक झाले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा देण्याची शक्यता आहे.

बहुमतच आघाडीच्या बाजूला नसल्यामुळे सभागृहात नाचक्की होण्यापेक्षा अगोदरच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सायंकाळपर्यंत वाट पाहून त्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

Exit mobile version